मुर्तीजापुर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत दिले गोवंशाना जीवनदान
प्रतिनिधी सुमित गुल्हने
लोक नजर मराठी न्यूज मुर्तीजापुर
मुर्तीजापुर काही दिवसान पूर्वी महान पोलिसांनी एका कत्तल खाण्यावर धाड टाकली असून पोलीस चौकी वर आरोपीन कडून दगडफेक करण्यात आली होती व पोलीस कर्मचर्यांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणा नंतर पोलीस कर्मचाऱ्यान मध्ये खूप रोष आहे.
आमदार हरीश पिंपळे यांनी विधानसभेत गौ हत्या बंदी कायदा अधिक कडक करावा या साठी आवाज उचलले होते त्याचे पडसाद महाराष्ट्र भर पाहण्यात मिळत आहे.
वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी धाड सत्र सुरु केले असून अनेक कत्तल खाण्यान वर कारवाई केली जात असून अनेक गोवंशाला जीवनदान दिले जात आहे. मुर्तीजापुर शहरात सध्या अनेक कत्तल खाणे जोरावर सुरु असून शहरातील जुनी वस्ती परिसरात काही भागात गौ मासची विक्री खुल्या पद्धतीने केली जात आहे. या आमदार हरीश पिंपळे व पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी जनते कडून जोर धरत होती.
काल मुर्तीजापुर शहरात मुर्तीजापुर शहर पोलिसांनी धडक कारवाई करत दिले गोवंशाना जीवनदान –
मुर्तीजापुर शहरात रोशनपुरा येथे एक अब्दुल जब्बार अब्दुल शहीद नामक व्यक्ती सर्रास पणे गौ हत्येचा कत्तल खाणा चालवत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिलाली असून मात्र योग्य वेळेची पोलिसांना प्रतीक्षा होती. दिनांक १९ डिसेंबर ला हा आरोपी आज काही जनावरांची कत्तल करणार आहे अशी माहिती PSI आशिष शिंदे यांना मिळताच तातडीने आपली टिम गठीत करून रोशनपुरा येथे जाऊन घटना स्थळाला धाव घेत गोवंशाना जीवनदान दिले.
आरोपी कडून बैल व गोरे ताब्यात घेतला असून आरोपी वर गुन्हा दाखल केला व गोवंशाना पुढील संगोपन व देखरेख करिता पुंडलिक महाराज गौरक्षण संस्था यांचे ताब्यात देण्यात आले.
आरोपीन वर अप.क्र 561/2024 कलम कलम 5,5 (अ),5(4) महा 9,9 (अ) महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियम 1976 (सुधारणा अघि 2015), कलम 11 प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक अदि सहकलम 119 अंतर्गत गुन्हा दाखल केला व त्यांचा कळून 105100 रु चा मुद्देमाल जप्त केला.
ठाणेदार अजित जाधव यांचा मार्गदर्शनात PSI आशिष शिंदे, PSI सूर्यवंशी, व पोलीस कर्मचारी ग्यानेश्वर राणे,सतीश चाटे, व गजानन ठाकरे, फुके यांचा सहायाने कारवाई पार पडली आहे.
कित्येक दिवसान पासून मुर्तीजापुर शहरात कत्तल खाण्यान वर अशी धडक कारवाई बघण्यात आली नव्हती मुर्तीजापुर शहरात अशे किती तरी कत्तल खाणे सुरु असल्याची चर्चा शहरात नेहमी सुरु असते, पण पोलीस प्रशासन काय करीत आहे? या कत्तल खाण्या वाल्यांना पोलिसांचे तीळ मात्र भय नाही का? असे प्रश्न जनता वेळो वेळी करत असते.
हे कत्तल खाणे छुप्या पद्धतीने शहरात भविष्यात असेच सुरु राहणार का कि PSI आशिष शिंदे सारखे दक्ष पोलीस या वर कारवाई राहणार कि दुसरे अधिकारी पण या कत्तलखाणे चालवणार्याचा मुसक्या आवळणार हे पाहणे रोचक ठरले आहे
————————————————