अकोला- अकोला पश्चिम मध्ये काँग्रेस मधील बंडखोरी शमली मात्र भाजपची डोकेदुखी वाढली
Anchor- अकोल्यातील अकोला पश्चिम मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत सर्वाधिक बंडखोरी पाहायला मिळाली. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान काँग्रेसचे बंडखोर आणि वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार झिशान हुसेन यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे अकोल्यातील अकोला पश्चिम मतदारसंघात मोठा धक्का वंचितला मानला जात आहे. काँग्रेस मधील बंडखोरी शमली असली तरी महायुतीतील बंडखोरी कायम आहे. भाजप नेते माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदाणी यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राजेश मिश्रा यांनीही आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. दरम्यान वंचितच्या उमेदवारानेच अर्ज मागे घेतल्याने मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता वंचित आघाडीकडून यावर नेमकी काय भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अकोला पश्चिम मध्ये आता चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
