“स्थानीक गुन्हे शाखा, अकोला पथकाने भाटे क्लब मैदानात ५ किलो ४१५ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा व साहीत्य असा एकुण २,४७,०००/-रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तीन आरोपींना केली अटक
दिनांक ०८/११/२०२४ रोजी स्थानीक गुन्हे शाखा अकोला येथील सपोनि विजय चव्हाण, पोउपनि गोपाल जाधव व माजीद पठाण हे त्यांचे पथकासह विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने अवैध धंदयावर कार्यवाही करणे करीता शहरात पेट्रोलींग करीत असतांना त्यांना मिळालेल्या गोपनिय बातमीवरून त्यांनी पो स्टे सिटी कोतवाली हददीतील भाटे क्लब मैदानात छापा कार्यवाही केली असता आरोपी नामे १) अब्दुल जुबेर अब्दुल नजीर वय ३८ वर्षे रा. पोळा चौक, नवाबपुरा जुने शहर अकोला (२) मोहम्मद फैज नासीर शेख वय २५ वर्षे रा. नर्गीस दत्त नगर, रेक्लेमेशन मुंबई नं ५०, बांद्रा वेस्ट मुंबई (३) अयाज रफिक कुरेशी वय २८ वर्षे नर्गीस दत्त नगर, रेक्लेमेशन मुंबई नं ५०, बांद्रा वेस्ट मुंबई यांचे कब्ज्यात ५ किलो ४१५ ग्रॅम अंमली पदार्थ गांजा एकुण किंमती १,०९,०००/- व रोख १८,०००/- रू एक मोपेड स्कुटर किंमती १,२०,०००/- असा एकणु २,४७,०००/- चा मुददेमाल जप्त केला आरोपी विरूध्द पो स्टे सिटी कोतवाली येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक अकोला श्री. बच्चन सिंह साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि श्री. शंकर शेळके, सपोनि विजय चव्हाण, पोउपनि, गोपाल जाधव, माजीद पठाण पो. अमंलदार सफौ. राजपालसिंह ठाकुर, गणेश पांडे, पोहेकॉ रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, भास्कर थोत्रे, पोना वसीम शेख पोकों अशोक सोनुने, सतिष पवार यांनी केली आहे.
