सर्वोपचार रुग्णालयात अपघात कक्षातील शिकाऊ डॉक्टरांनमुळे रुग्णांच्या जिवाला धोका
रिपोर्ट अदलाबदल झाल्यामुळे चुकीचे उपचार
अकोला प्रती – काही दिवसापूर्वी चिखलगाव येथील महादेव तायडे हे रुग्ण पायी चालता चालता पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला व हाता पायाला मार लागला होता, त्यामुळे त्यांना सर्वोपचार रुग्णालयातील अपघात कक्षात दाखल करण्यात आले. शिकाऊ डॉक्टरांनी त्यांना एक्स-रे व नंतर सिटीस्कॅन करायचा सांगितला. एक्स-रे व सिटी स्कॅन चा रिपोर्ट पाहुन डॉक्टरांनी सदर रुग्णाला मेंदूत रक्ताची गाठ असल्यामुळे नागपूरला न्या असे रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले. सदर रुग्णाच्या नातेवाईकांनी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांना ही माहिती दिली उमेश इंगळे यांनी अपघात कक्ष येऊन सदर एक्स-रे व सिटी स्कॅन चा रिपोर्ट वरिष्ठांना पाठवण्यासाठी सांगितला त्यावेळेस शिकाऊ डॉक्टरांनी वरिष्ठ डॉक्टरांना व्हॉट्स ॲप वर सदर रिपोर्ट पाठवला. वरिष्ठ डॉक्टरांनी पण नागपूरला नेण्यासाठी सूचना दिल्या. उमेश इंगळे यांनी डॉक्टरांना चर्चा करून मेंदूत गाठ कुठल्या साईडला आहे,किती मोठी आहे, अशा प्रकारे विचारणा केली असता सदर शिकाऊ डॉक्टरांनी सदर रिपोर्ट परत एक वेळा वरिष्ठ ना पाठवतो आणि सविस्तर विचारतो असे सांगितले तर थोड्यावेळाने सदर शिकाऊ डॉक्टरांनी सांगितले की, सदर रुग्ण नॉर्मल असून त्यांना थोडासाच मार लागलेला आहे त्यांना घरी घेऊन जाऊ शकता असे सांगितले सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी तुम्ही तर नागपूरला घेऊन जायचे सांगितले होते त्याचं काय अशी विचारणा केली असता सदर शिकाऊ डॉक्टरांनी सांगितले की तो रिपोर्ट त्या रुग्णांचा नसून दुसऱ्या रुग्णाचा होता. सर्वोपचार रुग्णालयातील अपघात कक्षातील शिकाऊ डॉक्टरांमुळे अशाप्रकारे चुकीचे रिपोर्ट बघून व व्हाट्सअप द्वारा सूचना देऊन उपचार केले जातात या अगोदरही अशाच प्रकारे चंद्रप्रकाश वानखडे या मुलाला कानाला थोडासा मार होता परंतु या शिकाऊ डॉक्टरांनी त्याला तात्काळ मेंदूला मार आहे असे सांगून नागपूरला पाठवले होते नागपूरला गेल्यानंतर तिथल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्याला सांगितले की तुला कानाला थोडासा मार आहे डोक्यात कुठल्याही प्रकारचा मार नाही तुम्ही नॉर्मल आहात घरी जाऊ शकता अशाप्रकारे अपघात कक्षातील शिकाऊ डॉक्टरांमुळे रुग्णांचा जीवाला धोका निर्माण झाला असून अधिष्ठाता मिनाक्षी गजभिये यांच्या कडे या विषयी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी अगोदरच तक्रार दिली असून त्यांच्या कडून दुर्लक्ष करण्यात आले.म्हणुन अपघात कक्षात उच्चशिक्षित व प्रशिक्षित डॉक्टर 24 तास उपलब्ध करून देण्यात यावेत. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी केली आहे