Anchor : एकीकडे बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न सर्व पक्षांच्या जेष्ठ नेत्यांकडून केले जात आहेय तर दुसरीकडे उमेदवारी अर्ज मागे न घेण्याच्या मागणीसाठी उमेदवाराला मतदार साकडे घालताना दिसत आहेय…
Vo 1 : अकोला पश्चिम ही जागा भाजप साठी अत्यंत प्रतिष्ठेची जागा आहे कारण गेल्या तीन दशकांपासून याठिकाणी भाजपचे उमेदवार स्व.गोवर्धन शर्मा निवडून आले आहेय..
सध्या भाजप मधील बंडखोरांमुळे ही जागा चर्चेची बनलीय..या ठिकाणी भाजपचे 19 कार्यकर्ते इच्छुक होते..उमेदवारी देण्यात येणार असा आश्र्वासन
हरिष अलीमचंदानी यांना भाजपच्या जेष्ठ नेत्यांकडून देण्यात आला असल्याचं हरिष अलीमचंदानी यांनी म्हंटलय..तिकीट न मिळाल्याने गेल्या 25 वर्षांपासून नगरसेवक राहिलेले हरिष अलीमचंदानी यांनी भाजप मध्ये बंड करत आपला नामांकन अर्ज दाखल केला…त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे न घ्यावा याकरिता अकोला पश्चिमच्या महिला मतदारांनी त्यांना घेराव घातला..चुकीच्या उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिली असून हरिष अलीमचंदानी यांनी माघार न घ्यावा अशी विनंती महिला मतदारांनी एका पात्रा द्वारे सुद्धा केलीय…
Byte : कमला बाई तायडे , मतदार
Vo 2 : तर आपण अपक्ष म्हणून निवडून आल्यावर सुद्धा भाजपशी एकनिष्ठ राहून भाजप सोबतच राहणार असल्याचं हरिष अलीमचंदानी यांनी म्हंटलय…
Byte : हरिष अलीमचंदानी , भाजप बंडखोर…
